आता तुम्हाला जवळचे फ्री वायफाय शोधून देणार फेसबुक !


मुंबई : आपल्या अँड्रॉईड आणि आयओएस युझर्सना फेसबुकने ‘फाईंड वायफाय’ हे फीचर देण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरची चाचणी गेल्या वर्षी सुरु करण्यात आली होती. आता जगभरातील युझर्सना चाचणी यशस्वी झाल्यानंतर या सेवेचा लाभ मिळणार आहे.

आता जगभरातील फेसबुक युझर्ससाठी ‘फाईंड वायफाय’ हे फीचर उपलब्ध आहे. ही सुविधा गेल्या वर्षी काही निवडक देशांमध्ये देण्यात आली होती, असे फेसबुकचे इंजिनिअरिंग डायरेक्टर अॅलेक्स हिमेल यांनी म्हटले आहे. केवळ प्रवास करणाऱ्या युझर्ससाठीच नव्हे, तर ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क मिळत नाही, अशा ठिकाणी ‘फाईंड वायफाय’ फीचर उपयोगी असल्याचे दिसून आले, असेही अॅलेक्स हिमेल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

फेसबुक अॅपमधील फ्री वायपाय हॉटस्पॉट शोधण्यासाठी मोअरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर फाईंड वायफाय हा पर्याय दिसेल. फाईंड वायफाय चालू केल्यानंतर जवळच्या डेटा सेंटर्सची माहिती मिळेल.

Leave a Comment