आयफोन, आयपॅडच्या दरात जीएसटीनंतर भरघोस कपात


नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर नवीन कर व्यवस्थेत अॅपलचे फोन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर असून जीएसटी लागू झाल्यानंतर अॅपलने आयफोन, आयपॅड, अॅपल वॉच आणि मॅकच्या किंमतीत मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. याबाबतचे वृत्त ‘गॅजेट ३६०’ या संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार जीएसटीचा अॅपलच्या उत्पादनांवर परिणाम स्पष्ट दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कंपनीने एमआरपीमध्ये मोठी कपात केली आहे.

Leave a Comment