गुगलचे ‘हे’ अॅप वाचविणार तुमचा मोबाइल डेटा


मुंबई – आपल्या मोबाइलमध्ये एखादे अॅप सुरु राहते आणि त्यामुळे इंटरनेट डेटा खर्च होतो त्यामुळे मोबाइल इंटरनेट वापरणा-यांसाठी सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे इंटरनेट डेटा सेव्ह करणे अवघड होऊन बसते. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण गुगलने नुकतेच इंटरनेट डेटा सेव्हिंग अॅप लाँच करण्याची माहिती दिली आहे. हे अॅप अशा युझर्ससाठी आहे ज्यांच्या इंटरनेट प्लॅनची एक ठराविक मर्यादा असते. या अॅपच्या माध्यमातून युझर्स इंटरनेट डेटा किती खर्च झाला याची माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर इंटरनेट डेटाचा विनाकारण होणारा खर्चही थांबविता येणार आहे.

गुगलच्या या नव्या अॅपचे नाव ‘ट्रँगल’ असे असून फिलीपाईन्समध्ये सध्या या अॅपची चाचणी सुरू आहे. हे अॅप गुगल प्लेवर उपलब्ध आहे. मात्र तो केवळ ठराविक भागासाठी कार्यरत असल्याने डाऊनलोड करता येणार नाही. या अॅपच्या माध्यमातून मोबाइल इंटरनेट डेटा किती खर्च झाला, मोबाइलचा किती डेटा शिल्लक आहे तसेच आवश्यक नसलेले मोबाइल अॅप अनेकदा चालू राहतात असे अॅपही डिअक्टिव्हेट करता येणार आहेत.

काही अॅप्स केवळ १० ते ३० मिनिटच सुरू ठेवण्याची परवानगी ट्रँगल अॅपमध्ये आपण देऊ शकतो. या अॅपमध्ये मोबाइलचा डेटाची सर्व माहिती आपल्याला स्क्रीनवर दिसते. शिवाय अॅप युजर्सना अतिरिक्त डेटा प्लानसारखे फायदे देखील मिळतात. सध्या हे अॅप फिलीपाईन्सच्या नागरिकांसाठी प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तर इतर युझर्स हे अॅप मिरर फाइलच्या माध्यमातून डाउनलोड करु शकतात.

Leave a Comment