
मुंबई : आजपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने घेतला आहे. बीएसएनएल हा नवा प्लॅन प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी घेऊन आले आहे.
बीएसएनएल देणार आता ६ पट जास्त डेटा
बीएसएनएलच्या प्लॅन ९९ च्या ग्राहकांना २५० एमबी डेटा मिळणार आहे. याआधी या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नव्हता. तर प्लॅन२२५ मध्ये ग्राहकांना आता २००एमबी ऐवजी १ जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅन७९९मध्ये ग्राहकांना ३जीबीऐवजी १०जीबी डेटा आणि अनलिमीटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. बीएसनएलच्या प्रिपेड ग्राहकांसाठीही लवकरच नवीन ऑफर येणार आहेत.
