लवकरच लाँच होणार जग्वारची एक्सई एसव्ही


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी जग्वार लँड रोव्हर आपली नवी जग्वार एक्सई एसव्ही लवकरच लाँच करणार असून स्पोर्टस् कारसारखे या कारचे लूक असणार आहे. ही कार सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे. या कारमध्ये ५.० लिटरचे व्ही 8 इंजिन देण्यात आले आहे. ज्याची पॉवर ५९२ बीएचपी ऐवढी आहे. या इंजिनला फाइन टय़ून करण्यात आले आहे. या कारमध्ये ६०० पीएसची पॉवर जनरेट करण्याची क्षमता असणार आहे. एक्सव्ही एसव्ही प्रोजेक्ट ८ टीमने डिझाइन केली आहे. सध्या या कारच्या किमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment