आपला मोटो सी प्लस हा स्मार्टफोन लिनोवो कंपनीने भारतात लॉंच केला होता. ग्राहकांना हा फोन फ्लिपकार्टवर ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. त्याची किंमत सध्या ६९९९ इतकी असून यावर विशेष एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये जुना स्मार्टफोन दिल्यावर ग्राहकांना ६५०० रुपये एवढे डिस्काऊंट मिळणार असल्यामुळे ग्राहकांना हा नवा मोटो सी प्लस फोन खरेदी करायचा असल्यास केवळ ४९९ रुपये भरावे लागणार आहेत.
फ्लिपकार्टची मोटो सी प्लससाठी अनोखी ऑफर
ग्राहकांना ऑनलाईन कंपन्यांकडून कायमच विविध ऑफर्स देऊन आकर्षित केले जाते. कंपनीने ही डिस्काऊंट ऑफर मोटो सी प्लसच्या फाईन गोल्ड, पर्ल व्हाईट आणि काळा या रंगाच्या मॉडेलवर दिली आहे. याशिवाय अॅक्सिस बॅंकेच्या क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ५ टक्क्यांची जास्तीची सूट दिली आहे.