
नवी दिल्ली: जीएसटी १ जुलैपासून लागू होणार असल्यामुळे अनेकांच्या मनात अनेक शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. कशाचा भाव वाढणार, कशाचे कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच जीएसटी लागू होण्यासोबतच १ जुलैपासून रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीचे नवे नियम लागू होणार आहेत. तर काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी १ जुलैपासून लागू होणार नवे नियम
आता तुम्हाला नव्या नियमांनुसार वेटिंग तिकिट मिळणारच नाही. तुम्हाला थेट आरक्षितच तिकिट मिळणार आहे किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंग तिकीट कन्फर्म होईल की नाही याचे टेन्शन जाणार आहे. तसेच नव्या नियमांनुसार तुम्ही जर ऑनलाइन बुकिंग करत असाल तर वेटिंग तिकीट मिळणार नाही.
नवीन नियमानुसार तत्काळ तिकिट आरक्षण रद्द केल्यानंतर आता ५० टक्के रक्कम परत मिळणार आहे. तसेच यापुढे प्रादेशिक भाषांमध्येही तिकिट उपलब्ध होणार आहे. १ जुलैपासून ‘सुविधा’ ट्रेन धावणार आहे. या रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळणार नाही. सर्वांना कन्फर्म तिकीट मिळेल. मात्र, तिकीट रद्द केल्यास फक्त अर्धी रक्कम परत मिळेल.
तुम्ही १ जुलैपासून एसी कोचचे तात्काळ तिकिट बुक करणार असाल तर सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान तिकिट बुकिंग करावे लागेल. तर स्लीपर कोचसाठी तात्काळ तिकिट बुकिंग करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. एसी फर्स्ट आणि सेकंडचे तिकीट रद्द केल्यानंतर १०० रुपये अतिरिक्त कापले जातील. थर्ड एसीसाठी ही रक्कम ९० रुपये आणि स्लिपर कोचचे तिकीट रद्द केल्यास ६० रुपये कापले जातील. १ जुलैपासून राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेससाठी पेपरलेस तिकीट मिळेल. या ट्रेनमध्ये मोबाइल तिकीट व्हॅलिड असेल. रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी वेकअप कॉल डेस्टिनेशन सारख्या सुविधा दिल्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
