मारूतीच्या या दोन कार १ जुलैपासून महागणार


मुंबई: १ जुलैला जीएसटी लागू झाल्यानंतर याचा प्रभाव वाहनांवरही पडणार आहे. अनेक कार्स स्वस्त होणार आहे पण मारूतीच्या दोन कार्स महाग होणार आहेत. जीएसटीचा मारुती सुझुकीच्या सियाज आणि एमपीवी अर्टिगा या कारवर वाईट प्रभाव होणार असल्यामुळे या दोन्ही कार्स साधारण ५० हजारांनी महाग होणार आहेत.

मारुती सुझुकीच्या या दोन्ही कार्सची विक्री चांगली आहे. सियाजचे प्रत्येक महिन्यात साधारण ५ हजार युनिट विकले जात आहे. तेच अर्टिगानेही चांगले मार्केट पकडले आहे. हायब्रिड कारवर जीएसटी कोणतीही सूट देत नसल्यामुळेच या दोन्ही कारच्या किंमती वाढणार आहेत. या कार्सची किंमत किती असेल हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी मीडिया रिपोर्टनुसार, यात १.५ लाखांची वाढ होऊ शकते.

या दोन्ही कार्समध्ये ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, स्मार्ट प्ले टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, कि-लेस एन्ट्री, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटन सारखे मॉडर्न फिचर्स दिले गेले आहेत. त्यासोबतच या दोन्ही कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, इएसपी आणि ISOFIX चाईल्ड सेफ्टी माऊंट सारखे सेफ्टी फिचर्सही दिले आहेत.

Leave a Comment