
ऑगस्ट २०१७ मध्ये भारतात जीप कम्पास या गाडीला लाँच केले जाणार असून या नव्या एसयूवीसाठी कंपनीने बुकिंगला देखील सुरूवात केली आहे. आता माहिती अशी आहे की, आतापर्यंत तब्बल १००० गाड्यांचे बुकिंग झाले आहे आणि आताच जीप कम्पासचे ब्रोशर देखील लिक झाले आहे. याबाबत ज्यामध्ये अधिक माहिती दिली असून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.
ऑगस्टमध्ये होणार भारतात लाँच होणार जीपची कम्पास
जीप रेनेगेडच्या प्लॅटफॉर्मवर जीप कम्पासला तयार करण्यात आले आहे. ही एसयूवी दिसण्यात ग्रँड चेरोकीमुळे प्रेरित झाली आहे. यामध्ये अमेरिकन एसयूवी लांबी ४४४७एमएम, रूंदी १८१८एमएम आणि उंची १६५१ एमएम ऐवढी आहे. तर व्हीलबेस २६४३ एमएम आणि क्लियरेंस १७८ एमएम आहे.
पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन ऑप्शनसोबत जीप कम्पास असणार आहे. १.४ लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन या एसयूवीमध्ये देण्यात आले आहे. तर यामध्ये १३८ बीएचपीची पावर असणार आहे. तसेच यामध्ये २ लीटर डिझेल इंजिन १७० बीएचपी पावर असणार आहे. यामध्ये ६ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड DDCT ड्युअल क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशन हे ऑप्शन देण्यात आले आहे. जीप कम्पासमध्ये ७ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, की-लेस एंट्री, स्टार्ट/स्टॉप बटन, एबीएस, ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, ६-एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट स्टार्ट, रियर कॅमेरा इत्यादि फीचर्स देण्यात आले आहेत. जीप कम्पासची किंमत ही २० लाख ते २५ लाख रुपये असणार आहे.
