२०० कोटींवर फेसबुकवरील सक्रिय युजर्सची संख्या !


कॅलिफोर्निया : तब्बल २०० कोटींवर सोशल नेटवर्किंगमध्ये जगात अग्रभागी असणाऱ्या फेसबुकवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या पोचली असून ही संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी आहे.

मंगळवारी फेसबुकवरून ही माहिती फेसबुकचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केली. फेसबुक समुदाय मंगळवारी सकाळपर्यंत हा आता अधिकृतपणे २०० कोटी लोकांचा झाला आहे. आम्ही जगाला जोडण्यात प्रगती करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक युजर्सची संख्या १०० कोटींवरून २०० कोटी होण्यास ५ वर्षांचा कालावधी लागला. ऑक्टोबर २०१२ मध्ये आम्ही १०० कोटींचा टप्पा गाठला होता, असे झुकेरबर्ग यांनी सांगितले. जगातील प्रत्येकाला जोडण्यासाठी आम्हाला मोठा पल्ला गाठायचा आहे. परंतु, लोकांना केवळ एकमेकांशी जोडण्याव्यतिरिक्त खूप काही करायला हवे. आपण त्यांना एकमेकांच्या जवळ आणायला हवे, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.

Leave a Comment