
जगातल्या बड्या ऑटो कंपन्या त्यांच्या व्यवसायाचा विस्तार भारतीय बाजारपेठेत करत असतानाच अमेरिकेतील सर्वात मोठी कस्टमाईज्ड मोटरसायकल बनविणारी कंपनी बिग डॉगही भारतात दाखल झाली आहे. या कंपनीची के ९ रेड चॉपर १११ बाईक भारतात नुकतीच लाँच करण्यात आली असून या बाईकची किंमत आहे ५९ लाख रूपये.
बिग डॉगच्या के ९ रेड चॉपर १११ ची भारतात एंट्री
या कंपनीचे भारतातील बिझिनेस हेड समर सोधी म्हणाले. आमच्या बाईक भारतात लाँच करून भारतीय बाजारात पाऊल टाकण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आपली बाईक युनिक असावी असे स्वप्न पाहणार्या भारतीय ग्राहकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. रेड चॉपरसाठी १८०७ सीसीचे ४५ डिग्रीचे व्ही ट्वीन इंजिन दिले गेले असून या बाईकची लांबी आहे १५ फूट. अर्थात ग्राहकाच्या गरजेप्रमाणे ती कमी करून दिली जाते. पुढील चाक मोठे तर मागचे चाक लहान आहे व बाईकचा बॅलन्स अतिशय उत्तम आहे. बाईकचे वजन ३४० किलो आहे.
