जपानचा आरोग्य फंडा- फॉरस्ट बाथिंग


जपान तंत्रज्ञानात जसा आघाडीवर आहे तसेच त्यांनी त्यांच्या रोजच्या जीवनात निसर्गाचे स्थानही कायम राखले आहे. धावपळीच्या आयुष्यात औषधे व व्यायामाशिवायही उत्तम आरोग्य प्राप्तीची किमया त्यांनी साधली असून या प्रकाराला त्यांनी शिनरिन योकू म्हणजे वृक्षांच्या सानिध्यात काही काळ घालविणे असे नांव दिले आहे. जगभरात हा प्रकार फॉरेस्ट बाथिंग म्हणजेच जंगल स्नान म्हणून लोकप्रिय होऊ लागला आहे. जपानने जंगल बाथिंगला त्यांच्या जनरल हेल्थ प्रोग्राममध्ये समाविष्ट करून घेतले आहे.


जपानने आयुष्यातील ताणतणाव कमी करून आरोग्यपूर्ण जीवनासाठी निसर्गाचा कसा उपयोग होऊ शकतो यावर गेली कित्येक दशके संशोधन केले आहे. यात जंगलात कांही काळ दाट झाडीत शांत पणे हिंडणे, फिरणे यामुळे आरोग्यप्राप्तीसाठी मोठी मदत मिळते हे दिसून आले. त्यातही जंगल बार्थिंग अधिक लोकप्रिय ठरते आहे कारण यामुळे केवळ झाडांमुळे शुद्ध हवाच मिळते असे नाही तर झाडांतून बाहेर पडणारी अनेक प्रकारची तेले, सुगंध आपल्या शरीरात झिरपतात व कोणत्याही व्यायाम व औषधांशिवायच आरोग्य प्राप्ती होते हे सिद्ध झाले आहे. जपानने त्यांच्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात जंगल बाथिंग १९८२ ला लाँच केले व आज जपानमधील आबालवृद्ध आठवड्यातून किमान एक वेळा तरी जंगल बाथिंगसाठी जातात. बाथिंग मुळे हृदय मजबूत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो असेही सिद्ध झाले आहे.

जपानबरोबरच युरोपातील अनेक देशांतही आता फॉरेस्ट बाथिंग क्लब चालविले जात आहेत व ते लोकप्रियही होत आहेत. भारतातही जंगल संपदा विपुल आहे त्यामुळे भारतीय नागरिकही निसर्ग देत असलेली ही मोफतही आरोग्यसेवा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नसावी.

Leave a Comment