बँक अकाउंट पोर्टेबिलिटीचे रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गवर्नरनी दिले संकेत


मुंबई: आपण आपला मोबाईल नंबर जसा पोर्ट करू शकतो त्याचप्रमाणे आता आपल्याला बँक अकाउंट नंबरही पोर्ट करता येणार आहे. आता बँक अकाउंट धारकांना देखील नंबर पोर्टेबिलिटीची ही सुविधा मिळणार आहे. बँक अकाउंट पोर्टेबिलिटिची आवश्यकता असून लवकरच ग्राहकांना ही सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गवर्नर एसएस मुंदडा यांनी दिल्यामुळे तुम्हाला लवकरच तुमचे अकाउंट नंबर तोच ठेवून बँक बदलता येऊ शकते. बँक अकाउंट नंबर पोर्टेबिलिटी जर भारतात सुरू झाली तर भारत अकाउंट पोर्टेबिलिटीची सुविधा देणारा पहिला देश ठरेल. जगात कुठेही सध्या बँक अकाउंट पोर्टेबिलिटी ही सुविधा उपलब्ध नाही.

मुंदडा यांनी म्हटले आहे की एकदा अकाउंट नंबर पोर्टेबिलिटी सुरू झाली तर सेवा न आवडलेला ग्राहक दुस-या बँकेकडे जाऊ शकतो. बीसीएसबीआई द्वारा जाहीर केलेल्या आचार संहितेचे मोठ्या संख्येने बँक पालन करत नाही. बीसीएसबीआई हे एक स्वायत्त संस्था आहे जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंडियन बँक असोसिएशन आणि अनुसूचित कमर्शियल बँके द्वारा स्थापन केली गेली आहे.

या गोष्टीची चिंता रिझर्व्ह बँकेला आहे की सर्व लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादा येतात. यावर केंद्रीय बँक लक्ष ठेवू शकत नाही की बँक ग्राहकांकडून सेवा देण्यास किती शुल्क आकारतात. गेल्या दोन वर्षांपासून आधार नामांकन झाले आहे. एनपीसीआईने प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आईएमपीएस सारख्या बँकिंग व्यवहारासाठी अनेक अॅप सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अकाउंट नंबर पोर्टेबिलिटिची शक्यता बळावली असल्याचे देखील मुंदडा म्हणाले.