
जगाला ऑनलाइन शापिंगची झिंग चढविण्यात अग्रेसर असलेल्या अमेझॉनच्या संस्थापकाला ऑफलाईन खरेदीची भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे अमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल सुरू असतानाच जेफ त्यांच्या कुटुंबियांसह इटलीतील बाजारात खरेदी करताना कॅमेर्यात पकडला गेला आहे.
अमेझॉनच्या जेफ बेजोसला ऑफलाईन खरेदीची भुरळ
जेफ सध्या त्याची पत्नी, आईवडील, भाऊ भावजय, बहीण मेहुणा अशा कौटुंबिक काफिल्यासह इटलीत आहे. रोमच्या प्रसिद्ध ऐतिहासिक कँपो देई फियोरी मार्केटमध्ये तो उन्हातान्हाची पर्वा न करता कुटुंबासह खरेदी करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. फ्लॉवर बॉक्स, फळे अशी किरकोळ खरेदी करताना तो दिसला आहे मात्र त्याने येथल्या दुकानांतून मोठी खरेदी काय काय केली त्याचा तपशील समजू शकलेला नाही.
