सरकारी कर्मचा-यांना पुढील महिन्यापासून मिळणार मोठा लाभ


नवी दिल्ली – सरकारी कर्मचा-यांना पुढील महिन्यापासून म्हणजेच जून महिन्यापासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार खुप मोठा लाभ होणार असून जून महिन्यापासून सरकारी कर्मचा-यांच्या एचआरएमध्ये मोठी वाढ होणार आहे. सरकारी कर्मचा-यांच्या एचआरएमध्ये वाढ करण्याची मागणी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये करण्यात आली होती. आता सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यामुळे जून महिन्यापासून एचआरए वाढून ४८००० रुपयांपर्यंत होणार आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात पूढील १५ दिवसांत प्रस्ताव पाठवला जाणार असून हा लवकरच मंजुर होईल असल्याचे वृत्त आहे. २७ एप्रिल रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना वित्त सचिव अशोस लवासा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालाची डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरतर्फे पडताळणी होणे अद्याप बाकी आहे. यानंतर हा अहवाल सेक्रेटरीजच्या कमिटीसमोर ठेवण्यात येईल. ही सर्व काम पूर्ण होण्यास पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सध्या देशात एकूण ४३ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आहेत. यासोबतच ५३ लाख पेन्शनधारकही आहेत. यासर्व कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाच्या अनुसार सविधा आणि बोनस दिला जात आहे. मात्र, आता या सर्वांना सातवा वेतन आयोगाच्यानुसार सर्व सुविधा मिळणार आहेत.

Leave a Comment