
अॅपलकडून युजर्ससाठी मनी ट्रान्स्फर सेवा लवकरच सुरू केली जात असल्याचे टेक न्यूज वेबसाईट रिकोडवर जाहीर केले गेले आहे. या वर्ष अखेरी ही सेवा सुरू होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ही सेवा म्हणजे अॅपलच्या अॅपल पे सेवेचा विस्तार असेल असेही सांगितले जात आहे.
अॅपलची मनी ट्रान्स्फर सेवा लवकरच
या सेवेमुळे अॅपलचे युजर दुसर्या अॅपल युजर्सना डिजिटली पैसे ट्रान्स्फर करू शकतील. यासाठी अॅपल वीजा बरोबर चर्चा करत असून अॅपल स्वतःचे वीजा डेबिट कार्ड बनविण्यासंदर्भात बोलणी करत आहे. या सेवेमुळे अॅपल युजर अधिक प्रमाणात अॅपल पेचा वापर करतील अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
