
नवी दिल्ली: आपल्या शानदार यु अल्ट्रा डिझायर या स्मार्टफोनच्या किंमतीत एचटीसी या मोबाईल कंपनीने मोठी कपात केली असून मार्चमध्ये हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत तेव्हा ५९,९९० रूपये ऐवढी होती. आता या स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात असून या स्मार्टफोनची किंमत ५२,९९० रूपये ऐवढी करण्यात आली आहे.
एचटीसीचा लेटेस्ट स्मार्टफोन झाला स्वस्त
२ इंचाचा सेकेंडरी डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला असून हीच या फोनची खासियत आहे. या स्मार्टसोबतच कंपनीने एचटीसी डिझायर १० प्रो या स्मार्टफोनच्या किंमतीतही घट केली आहे. या स्मार्टफोनवर २५०० रूपयांची सूट देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत लॉन्चवेळी २६,४९० रूपये ऐवढी होती त्यानंतर आता हा स्मार्टफोन २३,९९० रूपयांना मिळत आहे. हा स्मार्टफोन नोव्हेंवर २०१६ मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
