ट्विटरचे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खास हॅशटॅग


मुंबई – आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची १२६वी जयंती असून अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करतात. ट्विटरने त्यांच्या अनुयायांसाठी खास हॅशटॅग उपलब्ध करुन दिले आहेत. ट्विटवर #ambedkarjayanti हॅशटॅग केल्यानंतर बाबासाहेबांची प्रतिकृती असलेले इमोजी येईल. याव्यतिरिक्त ट्विटरने अजून चार हॅशटॅग दिले आहेत.

आपल्या अधिकृत अकाउंटवरुन ट्विटर इंडियाने एक व्हिडिओ ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे. ट्विटरने एकूण पाच हॅशटॅग तयार केले असून या पाचही हॅशटॅगनंतर ही इमोजी येणार आहे.

या पाच हॅशटॅगवर इमोजी
#AmbedkarJayanti
#अंबेडकरजयंती
#DalitLivesMatter
#JaiBhim
#जयभीम

Leave a Comment