
मुंबई : आपल्या ट्विटसमुळे नेहमीच वाद ओढावून घेणाऱ्या लेखिका शोभा डे यांनी यावेळी थेट परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाच टार्गेट करत ट्वीट केले आहे. पण त्यांची ही ट्विट्वि त्यांच्याच अंगलट आली. कारण स्वराज यांची बाजू घेत नेटक-यां शोभा डे यांनाच चांगले झापले आहे.
शोभा डेंनी पुन्हा ओढवून घेतला वाद
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्या देशाबाहेर अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांनी ट्विटरवरुन मदत मागितल्यास त्याची तातडीने दखल घेतात. त्यांना शक्य ती मदत पोहचवून दिलासा देण्याचा स्वराज यांचा कायम प्रयत्न असतो. सोशल मीडियावर स्वराज यांच्या तत्परतेचे वारंवार कौतुकही होताना दिसते. शोभा डे यांनी हाच मुद्दा पकडून ट्वीट केले आहे.
शोभा डे यांनी ‘सुषमा स्वराज : २०१७चा संकल्प- शांत राहा आणि ट्वीट थांबवा’ अशा आशयाचा ट्वीट केले आहे. . मात्र डे यांचा ट्वीट वाचून ट्विटराईट्स चांगलेच खवळले आहेत. एक दिवस तुम्हाला विमानतळावर त्यांची गरज भासेल आणि त्यांच्याकडे ट्विटरवरुन याचना कराल अशा संयमी ट्वीट्सपासून शोभा डेंना फक्त प्रसिद्धी हवी आहे. त्यांची हिंमत असती तर त्यांनी सुषमा यांना टॅग केले असते, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर उमटल्या.
