नव्या पॅनकार्डमध्ये छेडछाड करणे अशक्य


मुंबई – नवीन डिझाईन असलेले पॅनकार्ड सरकारने १ जानेवारी २०१७ पासून वितरित करण्यास सुरुवात केली असून सुरक्षेच्यादृष्टीने यामध्ये नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले असल्यामुळे आता या पॅनकार्डमध्ये छेडछाड करणे शक्य होणार नाही. यामध्ये सर्व माहिती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असून ही माहिती या विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या नवीन पॅनकार्डची रचना एनएसडीएल तथा युटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लि. ने केली आहे. नवीन अर्ज करणाऱ्या नागरिकांना १ जानेवारीपासून या कार्डचे वितरण करण्यात येत आहे. या नवीन कार्डमध्ये सरकारने क्विक रिस्पॉन्स कोड (क्युआर कोड) जोडलेले आहे. त्यामुळे उपयोगकर्त्याची सत्यता पडताळणी करणे सोपे जाणार आहे. सरकारच्या अंदाजानुसार संपूर्ण देशात दरवर्षी अडीच कोटी नागरिक पॅनकार्डासाठी अर्ज करत असतात.

Leave a Comment