नोकिया ६ साठी २४ तासांत २,५०,००० रजिस्ट्रेशन


नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. १९ जानेवारीला या स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये JD.comवर होणार आहे. २४ तासात या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनसाठी तब्बल २,५०,००० रजिस्ट्रेशन झाले आहेत.

एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मिडय रेंज स्मार्टफोन असलेल्या नोकिया ६ ला मिळालेला हा प्रतिसाद पाहता नोकिया स्मार्टफोन मार्केटमध्ये झोकात पुनरागमन करत असल्याचे दिसत आहे. नोकियाचा हा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन अँड्रॉईड ७.० नॉगटवर चालतो. यात ५.५ इंचाचा डिस्प्ले आहे. तसेत २.५ डी गोरिला ग्लास प्रोटेक्शनही आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० चिपसेट तसेच ४ जीबी रॅम आहे. ६४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून ती १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे तर ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी उतरवण्यात आला आहे. याची किंमत साधारण १६९९ युआन म्हणजेच साधारण १६,७५० रुपये इतकी आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात उपलब्ध होईल अशी आशा आहे.

Leave a Comment