
मुंबई : आपल्या ५० लाख पेन्शनधारकांना आणि जवळपास चार करोड भागधारांना कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओने आधार कार्ड सादर करणे अनिवार्य केले आहे.
पेन्शनधारकांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य!
ईपीएफओच्या सर्व भागधारकांना ३१ जानेवारी २०१७पर्यंत आधार कार्ड सादर करावे लागणार आहे. ज्या भागधारकांकडे आणि पेन्शनधारकांकडे आधार कार्ड नाही त्यांनी आधार कार्ड काढण्यासाठी केलेल्या अर्जाची माहिती द्यायची आहे. कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) १९९५ अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी पेन्शन आणि सद्य सदस्यांसाठी आधार कार्ड सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला केंद्र सरकार सर्व सदस्यांच्या पेन्शन खात्यात १.१६ टक्के योगदान देते. तर ८.३३ टक्के योगदान सदस्यांना करावे लागते.
