‘यांच्या’साठी पॅनकार्ड किंवा फॉर्म नंबर ६० बंधणकारक


मुंबई: केंद्र सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवणाऱ्या काळापैसा धारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी काही नवीन निर्णय जाहीर केले असून पॅनकार्ड किंवा फॉर्म नंबर ६० मुदत ठेवी आणि बचत खाती सोडून सर्व खात्यांसाठी देणे बंधणकारक करण्यात आले आहे. यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

याशिवाय ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ज्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशा खात्यांचा तपशीलही बँका आणि पोस्टाकडून आयकर विभागाने मागितला आहे. १ एप्रिल ते ९ नोव्हेंबरपर्यंतच्या अशा खात्यांच्या व्यवहारांची माहितीही मागवण्यात आली आहे. ही माहिती ३१ जानेवारीपर्यंत देणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे काळे पैसेधारकांना आणखी एक धक्का देण्याचा सरकारचा विचार असल्याचे दिसते आहे.

Leave a Comment