
मुंबई : ३१ डिसेंबरला रिलायन्स जिओची ‘वेलकम ऑफर’संपल्यानंतर १ जानेवारीपासून ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफर सुरु झाली असून या ऑफरनुसार जिओ युझर्सना रोज १ जीबी डेटा मोफत मिळणार आहे. शिवाय रोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा आनंदही घेता येईल.
रिलायन्स जिओच्या ‘वेलकम ऑफर’ची जागा ‘हॅप्पी न्यू ईयर’ने घेतली
जिओच्या युझर्सना आतापार्यंत रोज ४जीबी मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा होती. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे. ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरनुसार जिओ युझर्सना आता ३१ मार्च २०१७ पर्यंत रोज १ जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळेल. दिवसभरात १जीबी डेटा वापरल्यानंतर १२८Kbps या स्पीडने डेटा मिळेल. १ जानेवारीपासून जिओने वेलकम ऑफरला नव्या रुपात सादर केले आहे. ज्यानुसार ग्राहकांना आता ४जीबी ऐवजी १ जीबी डेटा मिळेल.
