१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प


नवी दिल्ली – ३१ जानेवारीपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात होणार असून, अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबतचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळातील संसदीय कामकाज समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान पहिल्या टप्प्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेच्या दोन्ही सभागृहांना ३१ जानेवारीला संबोधित करतील. तसेच ३१ जानेवारीलाच आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.

Leave a Comment