
नवी दिल्ली : कॅशलेस व्यवहार अधिक सुरळीत करण्यासाठी ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भिम अॅप लाँच केले, पण लाँचिंगनंतर अवघ्या २४ तासात या अॅपचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे युझर्सना अडचणींचा सामना करावा लागला. ट्विटरवर अॅपचे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती भिम अॅपकडून देण्यात आली. सर्व्हरवर लोड आल्याने युझर्सना अडचण येत असून लवकरच याची नवीन अपडेट दिली जाईल, असे भिम अॅपकडून सांगण्यात आले.
अवघ्या २४ तासात गडबडले भिम अॅप
हे अॅप बँकेचे व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आले असून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप तयार केले आहे. दरम्यान या अॅपची नवीन अपडेट जारी केल्यानंतर व्यवहार सुरळीत होत आहेत. अनेक युझर्सनी या अॅपविषयी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी अडचण येत असल्याचे म्हटले आहे.
