मुंबईत सीएनजी स्कूटीचे अनावरण


मुंबई : सीएनजीवर चालणाऱ्या स्कूटीचं मुंबईत अनावरण करण्यात आले असून १.२ किलो सीएनजी सिलेंडरची क्षमता असलेली ही दुचाकी ९० ते ११० किमीपर्यंत धावू शकते. या दुचाकीचे अनावरण केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. स्वस्त आणि पर्यावरणपूरक असे या दुचाकीचे वैशिष्टय आहे.

दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी प्रस्तावित मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. तर जे विद्यार्थी ग्रीन एनर्जीचा वापर करतील, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष गुणांचा विचार केला जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. राज्यातील प्रमुख शहरातील विद्यार्थ्यांनी सीएनजी बाईकचा वापर केल्यास अतिरिक्त गुण दिले जातील, ज्यामुळे पर्यावरणाचाही फायदा होईल, असे विनोद तावडे म्हणाले.

Leave a Comment