आसूसने लॉन्च केला कमी किंमतीचा झेनफोन


मुंबई: नव्या वर्षाच्या निमित्ताने अनेक मोबाईल कंपन्या आपले नवे स्मार्टफोन बाजारात आणत असून तैवानची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी आसूसने आपला नवा ४जी स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. आसूस झेनफोन गो ४.५ LTE हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लवकरच उपलब्ध होणार असून या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये ऐवढी असेल.

२७ जानेवारीपासून हा स्मार्टफोन भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. कमी किंमत असल्याने सर्वसामान्यांना हा स्मार्टफोन अधिक परवडू शकतो. सोबतच महागड्या फोनसारखेच कमी किंमतीत फिचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड मार्शमेलो ६.० ऑपरेटिंग सीस्टिम, १ जीबी रॅम, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० क्वॉड कोअर प्रोसेसर, ४.५ इंच स्क्रिन ८५४×४८० रिझॉल्यूशनचा डिस्प्ले, ८ जीबी मेमरी, ८ मेगापिक्सेलचा रिअर आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment