रिझर्व्ह बँकेने हप्ते भरण्याची मुदत पुन्हा वाढवली


मुंबई: कर्जाचे हप्ते भरण्यासाठी असलेली मुदत रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) वाढवल्यामुळे कर्जधारकांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी थोडीशी उसंत मिळणार आहे. आरबीआयने ही मुदत आणखी ३० दिवसांनी वाढवली आहे.यापूर्वी आरबीआयने २१ नोव्हेंबरला ही मुदत ६० दिवसांनी वाढवली होती. मात्र, नव्या मुदतवाढीमुळे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मिळालेल्या मुदतीचा कालावधी हा ९० दिवस झाला आहे.

आरबीआयने हा निर्णय एक पत्रक काढून जाहीर केला आहे. कर्जधारकांना वाढीव मुदतीचा लाभ कर्जाच्या नोव्हेबर आणि डिसेंबरच्या हप्त्यांसाठी असणार आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात व्यापक प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण असून, कर्जधारकांनाही कर्जाचे हप्ते भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे या पेचावर मार्ग काढण्यासाठी आरबीआयने हा उपाय शोधल्याचे बोलले जाते आहे.

Leave a Comment