
मुंबई: टेलिकॉम विश्वात रिलायन्स जिओमुळे एकच धुमाकूळ झाला आणि जिओला टक्कर देण्यासाठी एकामागून एक वेगवेगळ्या कंपन्या नवनवे प्लॅन लॉन्च करत आहेत. आता अनलिमिटेड कॉलसाठी एअरटेलनेही मायप्लान इनफिनिटी ऑफरची घोषणा केली असून या ऑफरमध्ये दोन पोस्टपेड प्लान ५४९ आणि ७९९ रूपये आहेत.
एअरटेलने लाँच केले ‘फ्री अनलिमिटेड कॉलिंग’ पॅक
एअरटेलच्या मायप्लान इनफिनिटी ऑफरनुसार ५४९ प्लानमध्ये अनलिमिटेड एसटीडी आणि लोकल कॉलिंग, १०० मेसेज, ३ जीबीपर्यंत ४जी डेटा, तर ३जी हँण्डसेट यूजरसाठी १ जीबी डेटा मिळेल. तर ७९९च्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत ५ जीबी ४जी डेटा मिळणार आहे.
एअरटेलने याआधीही प्रीपेड ग्राहकांसाठी फ्री कॉलिंग प्लानची घोषणा केली होती. यामध्ये ४जी डेटासह अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल मिळणार आहे. १४५ रुपयात हा प्लान मिळणार आहे. तर ३४५ रुपयांच्या प्लानमध्ये देशातील कोणत्याही नेटवर्कवर लोकल-एसटीडी कॉलसोबत ४जी डेटा मिळणार आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी दोन्ही प्लान २८ दिवस वैध असणार आहे.
