सोव्हियेत काळातील चांद्रमोहिमा रशियात पुन्हा सुरू

space
सोव्हियेत रशियाच्या काळात चालू असलेल्या चंद्रावरील संशोधनाचा अंतराळ कार्यक्रम रशियाची विज्ञान अकादमी पुन्हा सुरू करत आहे. यासाठी रशियाने अनेक प्रकारची चांद्रयाने बनवली आहेत. चंद्रावर रशियाची संशोधन केंद्रे स्थापित करण्यास त्या मदत करतील. यासाठी तीन लाख डॉलर म्हणजेच दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत.

चन्द्रावरील रशियन संशोधन केंद्राची स्थापना करण्यात गुंतलेल्या संस्था या सोव्हियेत काळातील संस्थाच आहेत. रशियाच्या विज्ञान अकादमीतील अंतराळ संशोधन संघटन, रशियन अंतराळ संघटनेची मुख्य विज्ञान संस्था म्हणजेच केंद्रीय इंजीनियरिंग संशोधन संस्था आणि लावचकिन वैज्ञानिक उत्पादन संघटना इ. या त्या संस्था आहेत.

केंद्रीय रोबो व सायबर तंत्रज्ञान शास्त्र शोध व डिझाइन संस्थेचे इंजीनियर आणि डिझायनर अलेक्झांडर खखलोफ़ म्हणाले, “या चांद्रयानाच्या निर्मितीचा समावेश 2026 ते 2035 पर्यंत चालणाऱ्या केंद्रीय अंतराळ कार्यक्रमात करण्याची रशियन शास्त्रज्ञांची इच्छा आहे. असे झाल्यास आणि रशियन सरकारने आर्थिक अनुदान चालू ठेवले, तर 2031 सालापर्यंत रशिया चंद्रावर संशोधन केंद्र स्थापन करू शकेल.”

सोवियत संघाने पहिल्यांदा 1969 साली चंद्रावर यान पाठवले होते आणि चंद्राच्या संशोधनासाठी एकूण तीन मोहिमा राबवल्या होत्या. त्या तिन्ही मोहिमांमध्ये चंद्राचा पृष्ठभाग व सूर्यकिरणांच्या परावर्तनाचा अभ्यास करण्यात आला होता. आता शास्त्रज्ञांना चंद्राचा भूशास्त्रीय नकाशा बनवायचा असून चन्द्रावर कोण-कोणती खनिजे आहेत, हे त्यांना जाणायचे आहे.

चंद्राचा अभ्यास करण्यासाठी ’ल्यूना ग्लोब’ और ’ल्यूना रिसोर्स’ नावाचे चांद्रयान बनवले जातील. त्यानंतर रशियन अंतराळवीर पहिल्यांदा 2031 साली चंद्रावर उतरतील.

रशियाच्या अंतराळ धोरण संस्थेचे संचालक इवान मोइसियिफ़ या म्हणाले, की “कदाचित आता लवकरच चंद्राच्या ध्रुवांवर ताबा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू होईल. कदाचित या शतकाच्या शेवटापर्यंत चंद्रावर क्षेपणास्त्रांचे इंधन बनविणे किंवा अंतराळातील साहित्याचे उत्पादन करणे हे पृथ्वीवरील त्यांच्या उत्पादनापेक्षा खूप स्वस्त पडेल.”

Leave a Comment