
मुंबई – लवकरच टाटा ट्रस्टच्या चेअरमनपदावरुन प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा पायउतार होऊ शकतात. टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची ६६ टक्के गुंतवणूक असून, १०८ अब्ज डॉलर्सच्या टाटा उद्योगसमूहातील टाटा सन्स प्रमुख होल्डींग कंपनी आहे.
टाटा ट्रस्टच्या चेअरमनपदावरुन पायउतार होणार रतन टाटा ?
ट्रस्टने नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी सल्लागार नियुक्त केला असून, ट्रस्टवर नव्या अध्यक्षाची निवड पुढच्यावर्षीच्या मध्यापर्यंत होऊ शकते. टाटा ट्रस्टचा पुढचा चेअरमन भारतीय असेल पण तो पारसी किंवा टाटा कुटुंबातील असेलच असे नाही. टाटा समूहाचे विश्वासू आर.के.क्रिष्णा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली. नोंदणीकृत टाटा कंपन्यांमध्ये टाटा ट्रस्टची ४१ अब्ज डॉलरची गुंतवणूक आहे.
