बँकेत २ लाख रुपये भरणाऱ्यांवर येणार बंधने

rbi
नवी दिल्ली- बँक खात्यात नोटाबंदीनंतर दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांवर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची नजर असणार असून खात्यात ९ नोव्हेंबरपासून दोन लाख किंवा त्याहून जास्त रक्कम असणाऱ्या खात्यांवर काही बंधने येणार आहेत.

बँक खात्यात दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम ९ नोव्हेंबरनंतर भरणाऱ्या त्या बँक खात्यात ५ लाखाच्यावर असतील अशा खात्यांमधील रक्कम काढण्यावर बंधने येणार आहेत. खातेधारकांना पैसे पॅन कार्ड दाखवून किंवा फॉर्म ६० भरुनच या काढता येणार आहेत. अन्यथा या खात्यांमधून पैसे ट्रान्सफरही करता येणार नाहीत. जनधन खात्यांमध्ये वर्षाकाठी फक्त ५० हजार रुपये जमा करण्याची मुभा सध्या देण्यात आली आहे. महिन्याला फक्त १० हजार रुपयांची रक्कम या खात्यांमधुन काढता येणार आहेत.

Leave a Comment