नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर खात्याला सापडले २९०० कोटी

incom-tax1
नवी दिल्ली – नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर देशभरात आयकर खात्याने विक्रमी ५८६ छापे मारले. ३०० कोटींची रोख रक्कम यामध्ये २ हजाराच्या नव्या नोटेमध्ये ७९ कोटी आणि २६०० कोटींचे बेहिशोबी उत्पन्न या छाप्यांमध्ये सापडले. सर्वाधिक घबाड आयकर खात्याला तामिळनाडूमध्ये सापडले.

१०० कोटी पेक्षा जास्त रोकड एकटया चेन्नईमध्ये सापडली असून १४० कोटी पेक्षा जास्त रोकड तामिळनाडूमध्ये सापडली असून, ५२ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. दिल्लीतील एका वकिलाच्या घरातून १४ कोटींची रोकड सापडली. याच वकिलाने ऑक्टोंबर महिन्यात १२५ कोटी रुपयांचे बेहिशोबी उत्पन्न जाहीर केले होते.

पुणे पर्वती येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर बुधवारी छापा मारल्यानंतर एका व्यक्तीचे १५ लॉकर सापडले. या लॉकरमध्ये ९.८५ कोटी रुपये होते. आठ कोटी २ हजाराच्या नव्या नोटेमध्ये आणि उर्वरित रक्कम १०० रुपयांमध्ये होती. पुण्यामधून १०.८० कोटी जप्त करण्यात आले. यात ८.८ कोटीची रोकड नव्या नोटेमध्ये होती.

Leave a Comment