
पॅनासोनिकने त्यांचा नवा स्मार्टफोन नव्या हँडसेटसह सादर केला असून या हँडसेटमध्ये तीन एलईडी फ्लॅशसहचे कॅमेरे दिले गेले आहेत. पी ८८ नावाने बाजारात आलेला हा स्मार्टफोन कंपनीने ९२९० रूपयांत उपलब्ध करून दिला आहे व भारतातील सर्व रिटेल शॉपमध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध अ्राहे. चारकोल ग्रे व गोल्ड अशा दोन रंगातील हा फोन अतिशय क्लासिक स्टाईलचा आहे.
तीन एलईडी फ्लॅशसह पॅनासोनिकचा पी ८८ फोन सादर
या फोनसाठी ५.३ इंची एचडी २.५ कर्व्ह डिस्प्ले दिला गेला आहे. २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, १३ एमपीचा रिअर कॅमेरा दोन एलईडी फ्लॅशसह आहे तर ५एमपीच्या फ्रंट कॅमेर्या्लाही एक फ्लॅश दिला गेला आहे. हा ड्यूल सिम फोन आहे.
