५०० रूपयांच्या नव्या नोटांचा दुष्काळ संपणार

swadeshi-500
नोटबंदीमुळे देशात सध्या जी अभूतपूर्व रोकड टंचाई निर्माण झाली आहे ती दोन आठवड्यात संपण्याची शक्यता असून ५०० रूपयांच्या नव्या नोटा येत्या दोन आठवड्यात मुबलक प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे आर्थिक धोरण सचिव शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, प्रथमच या नोटा विदेशी डिझाईनने नाही तर पूर्णपणे स्वदेशी डिझाईनच्या आहेत व त्यामुळे त्यांच्यावरील सुरक्षा मानकांची सहजासहजी नक्कल करणे सोपे नाही.

नोटबंदी नंतर जवळजवळ ८६ टकके नोटा चलनातून बाद होणार होत्या व त्यामुळे रोख रकमेची टंचाई जाणवणार याचा अंदाज घेऊनच प्रथम दोन हजार रूपये मूल्याच्या अधिक नोटा छापल्या गेल्या होत्या असे स्पष्ट करून ते म्हणाले आता सरकारने सर्व लक्ष ५०० रूपयांच्या नोटा छपाईवर केंद्रीत केले आहे व लवकरच या नोटा मुबलक प्रमाणात नागरिकांना मिळतील. चलन टंचाई कमी करण्यासाठी रिझव्हॅ बँकेनेही गेल्या पाच आठवड्यात १०० रूपये व त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटा प्रचंड प्रमाणात बाजारात आणल्या असून हे प्रमाण रिझर्व्ह बँकेकडून दरवर्षी जेवढ्या नोटा आणल्या जातात त्याच्यापेक्षाही कितीतरी अधिक आहे.

Leave a Comment