पक्ष्यांच्या घरट्यांत राहण्याचे सुख येथे मिळेल

iran
पक्षी राहण्यासाठी सुंदर घरटी बांधतात व त्यातही प्रत्येक पक्षाचे घरटे वेगळे वेगळ्या डिझाईनचे असते. माणसेही राहण्यासाठी घरे बांधतात व त्यातही खूपच वैविध्य असते. घर बांधताना ते वेगळे असावे अशी प्रत्येकाची इच्छाही असते. मात्र पक्ष्यांच्या घरट्यांसारख्या घरांत राहायची इच्छा होत असेल तर त्यासाठी थेट इराण गाठावे लागेल. इराणच्या कंदोवन भागात अशी घरे आहेत, तीही डोंगरउतारावर व ७०० वर्षे जुनी.

बाहेरून पाहताना ही घरे विचित्र वाटतील पण आरामाबाबत मात्र ती कोणत्याही घरांना मागे टाकतील अशी त्यांची रचना आहे.७०० वर्षांपूवी इराणमधील ज्वालामुखी पहाडांवरील खडकांत ही घरे कोरले गेली आहेत. त्यातील कांही भाग भूमिगत आहे तर कांही भाग वर दिसतो. असे सांगतात की मंगोलांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्याकाळी ही घरे बांधली गेली. या घरांचे वैशिष्ठ म्हणजे बाहेरच्या हवामानाप्रमाणे घरांचे तापमान बदलते. म्हणजे उन्हाळ्यात ती छान थंडगार राहतात तर हिवाळ्यात उबदार असतात.

gharati
ही घरे व हा परिसर पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. येथील अनेक घरे मध्यंतरी विक्रीसाठी होती तर भाड्यानेही दिली जात होती. आता हा सर्व परिसर रिसॉर्ट सारखा वापरला जात आहे. त्यामुळे येथे हॉटेल्स, रेस्टॉरंट व औषधी गुणधर्म असलेले मिनरल वॉटर यांचीही सुविधा करून दिली गेली आहे. अलिकडे या पौराणिक घरांना कांही ठिकाणी आधुनिक दारे व खिडक्याही बसविल्या गेल्या आहेत.

Leave a Comment