बिग बाझारमधूनही आता काढता येणार पैसे

big-bazar
मुंबई – नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी बिग बाजारने एक घोषणा केली आहे. ज्या लोकांकडे डेबिट कार्ड आहे ते लोक बिग बाजारमधून दोन हजार रूपये काढू शकणार आहेत. गुरूवारी २४ नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे. लोकांच्या मदतीसाठी बिग बाजार मिनी एटीएम लावणार आहेत. यासाठी एक सोपी प्रोसेस आहे. यात तुम्ही तुमचे डेबिट कार्ड स्वाईप करा, पिन नंबर टाका आणि २००० रूपये एंटर करा. पैसे तुमच्या हातात असतील.

८ नोव्हेंबरपासून चलनातील ५०० आणि १०००च्या नोटा बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. यानुसार ५०० आणि हजारच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बदलून घ्यायच्या आहेत. यासोबतच २००० आणि ५०० च्या नव्या नोटाचीही घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच एटीएम आणि बॅंकांबाहेर लोकांनी गर्दी केली आहे. जी अजूनही संपण्याचे नाव घेत नाही. लोकांना त्यांच्या नोटा बदलण्यासाठी बॅंकांच्या चकरा माराव्या लागत आहेत.

नोटबंदी झाल्यावर एटीएममधून चार हजार रूपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. ती वाढवून ४५०० करण्यात आली. मात्र, पुन्हा या निर्णयात बदल करण्यात आले. पुन्हा लोकांना केवळ २००० रूपये काढण्याचीच मुभा देण्यात आली. तेच लग्न असलेल्या परीवारांना २.५ लाख रूपये काढण्याची सूट देण्यात आली आहे. त्यासाठी ७ नियम देण्यात आले.