फक्त २२ रुपयांत ओलासोबत अनुभवा बीएमडब्ल्यूची सफर

ola
मुंबई: आता मुंबईकरांचा प्रवास श्रीमंतीचे प्रतिक असलेली बीएमडब्लू कार सुखकर करणार असून आता टॅक्सीच्या रुपात मुंबईत बीएमडब्लू कार धावाताना लवकरच दिसणार आहे.

यासंदर्भात बीएमडब्लू आणि ओलाने एकत्रित येऊन घोषणा केली असून ही गाडी ओलाच्या अॅपवर २२ रुपये किलोमीटर दराने उपलब्ध होणार आहे.

ओलाची ही सेवा मुंबई, दिल्ली आणि बंगळरुमध्ये सुरु होणार असून या शहरात बीएमडब्ल्यूच्या प्रवासासाठी कमीतकमी २५० रुपये आणि प्रतिकिलोमीटर २१ ते २२ रुपये आकारले जातील. त्यासाठी ओलाकडून पुढील सहा महिन्यात एक हजार गाड्या रस्त्यावर उतरवल्या जातील. दरम्यान, यासाठी ओलाकडून बीएमडब्ल्यू चालवण्याची इच्छा असणाऱ्यासाठी स्वस्तदरात कर्जही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.