हिरोच्या इलेक्ट्रिक दुचाकीवर तब्बल १०००० रुपयांची कॅशबॅक ऑफर

hero
नवी दिल्ली: यंदाच्या दिवाळीत आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीवर देशातील दुचाकीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये आग्रगण्य असलेल्या हिरोने तब्बल १०००० रुपयांच्या कॅशबॅक ऑफरची घोषणा केली असून सरकारकडून ही ऑफर उत्तम प्रदर्शन करणाऱ्या ई-स्कूटर्सवरील १७०००च्या सबसिडीपेक्षा वेगळी आहे.

याबाबत हिरोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या पेटीएमसोबत कंपनीने सहकार्य करार केला असून तसेच लीथियम इलेक्ट्रिक बाईकवर पेटीएममार्फत १०००० रुपयांची कॅशबॅक दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना हिरोच्या ग्लोबल बिझनेस विभागाचे सीईओ सोहिंगर गिल यांनी सांगितले की, २०२०पर्यंत ३० लाखाहून अधिक इलेक्ट्रिक गाड्या भारतीय रस्त्यावर उतरवण्याचे लक्ष्य हिरो इलेक्ट्रिकने ठेवले आहे. ही घोषणा याचाच एक भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मोठी सीरीजच भारतीय बाजारपेठेत हिरो इलेक्ट्रिकने उतरवली आहे. यामध्ये ऑप्टिमा, मॅक्सी, क्रूज, निक्स आणि फोटोन तसेच ई-स्प्रिमट मॉडेल आदी प्रमुख दुचाकींचा समावेश आहे. हिरो इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे गाड्यांची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी निक्स स्कूटर्स बाजारपेठेत लॉन्च केली आहे. यामध्ये लीथियम ऑयन बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, हिरोने निक्स स्कूटर्सवर ५००० रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली आहे.

Leave a Comment