शाओमीचा नवा स्मार्टफोन Mi Note 2 लॉन्च

xaiomi
मुंबई : आपला नवाकोरा नवा स्मार्टफोन शाओमी Mi Note 2 हा चीनची मोबाईल उत्पादक कंपनी शाओमीने लॉन्च केला असून सॅमसंग Galaxy S7 प्रमाणे या स्मार्टफोनचा डिस्‍प्‍ले डुअल एज कर्व्ड डिस्प्ले असणार आहे अशी चर्चा आहे. हा स्मार्टफोन ४जीबी आणि ६जीबीच्या वेरिऐंटमध्ये उपलब्ध झाला आहे.

शाओमीने ट्विट करत २१ ऑक्‍टोबरला माहिती दिली होती की, Mi Note हॅज बिन कर्व्ड टू इम्प्रेस’ यावरुन हे स्पष्ट झाले होते की हा डुअल एस कर्व्‍ड डिस्‍प्‍ले असणारा स्मार्टफोन असणार आहे. हा डिस्प्ले सॅमसंग Galaxy S6 एज आणि सॅमसंग Galaxy S7 मध्ये होता. या हँडसेटमध्ये ५.७ इंचाचा सुपर AMOLED(१४४०×२५६० पिक्‍सेल) डिस्प्ले असणार आहे. जो फोर्स टच टेक्नोलॉजीसोबत असणार आहे. फोर्स टच (३डी टच) ही टेक्नोलॉजी आयफोन ६एस प्रमाणे असणार आहे. शाओमी Mi Note 2 मध्ये ६४-बिट स्नॅपड्रॅगन ८२१ क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. ग्राफिक्ससाठी एड्रीनो ५३० जीपीयु देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज वेरिएंट असणार आहे. शाओमी Mi Note 2 ची किंमत भारतात जवळपास ४०,००० रुपये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment