
नवी दिल्ली: ग्राहकांना जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘फ्रिडम २५१’ दिल्यानंतर आता रिगींग बेल्स ही कंपनी ग्राहकांना एचडी एलईडी टीव्ही देण्याच्या तयारीत असून कंपनीने नुकतीच याची घोषणा केली होती. त्यानुसार स्वातंत्र्यदिनापासून एलईडी टीव्हीची ऑनलाइन बुकिंग स्वीकारणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
स्वातंत्र्यदिनापासून रिगींग बेल्सच्या एचडी एलईडीची बुकिंग
एलईडी टीव्हीचीही किंमत रिंगीग बेलने कमी ठेवली असून जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे. ३१.५ इंचाच्या एलईडी टीव्हीसाठी ९,९०० रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. ठरलेल्या वेळात मोबाईल ग्राहकांपर्यंत पोहोचवता आला नव्हता. एलईडी टीव्हींची दुस-या दिवसापासूनच १६ ऑगस्टपासून डिलिव्हरी सुरु करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
आदल्या दिवशी ऑर्डर स्वीकारल्यानंतर लगेच दुस-या दिवशी डिलिव्हरी कशी पोहोचवणार एकूणच या प्रक्रियेबाबत अस्पष्टता आहे. फक्त एका दिवसासाठी ही सुविधा असून, रिंगीग बेलच्या वेबसाईटवरुन बुकिंग करावे लागेल. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे एलईडी टीव्ही मिळाल्यानंतर कॅश द्यावी लागेल. सध्या ऑनलाइन पोर्टलवर चांगल्या ब्राण्डच्या ३१.५ इंच एलईडी टीव्हीची किंमत १३ ते १७ हजार दरम्यान आहे.
