भारतीयांसाठी ट्विटरचे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल इमोजी

twitter
नवी दिल्ली – आतापासूनच भारताच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी याची तयारी होताना बघायला मिळाली आहे. तर सोशल मिडियातही अनेकजण स्वातंत्र्य दिनासंबंधी अनेक गोष्टी शेअर करताना दिसत आहेत. यात ट्विटरनेही पुढाकार घेतला असून या ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ट्विटर इंडियाने एक स्पेशल I-Day इमोजी देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल इमोजीने ट्विटर इंडिया भारतीयांसोबत हा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर ट्विटर इंडियाचा हा स्पेशल तीन रंगाचा इमोजी लाईव्ह केला जाणार आहे. म्हणजे हा इमोजी १४ ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजतापासून तुम्हाला वापरता येणार आहे. १७ ऑगस्टपर्यंत हा इमोजी वापरता येणार असल्यामुळे सोशल मिडियात हा स्वातंत्र्य दिन अधिकच चांगला आणि रंगीबेरंगी साजरा करता येणार आहे.

भारतीय लोक जगभरात स्वातंत्र्य दिनाच्या पोस्ट #India #इंडिया #IndiaAt69 #भारत #IndiaIndependenceDay हे हॅशटॅग वापरून शेअर करू शकता. ट्विटर इंडियाने नेहमीच वेगवेगळ्या उत्सवांवेळी काहीना काही केले आहे. ट्विटरचे हे स्पेशल इमोजी सर्वांना एकत्र आणण्याचे एक माध्यम आहे. एकत्रपणे हा उत्सव साजरा करण्याचेही माध्यम आहे. या इमोजीमुळे ट्विटरवरील लोकांना काहीही ट्विट करताना एक वेगळाच फिल येईल.

Leave a Comment