९०० कोटींना ‘डॉट वेब’ डोमेनची विक्री

domain
नवी दिल्ली : ‘नू डॉट कॉम’ने ९०० कोटी रुपयांना ‘डॉट वेब’ डोमेनची खरेदी केली असून ‘नू डॉट कॉम’सोबत या लिलावात गूगल, एफिलियास, रेडिक्स आणि डू नट्स यांचाही सहभाग होता. विशेष म्हणजे ‘डॉट वेब’च्या विक्रीला चार वर्षांचा कालावधी लागला. मात्र, ‘नू डॉट कॉम’ने लावलेली बोली ही सर्वात जास्त होती.

डोमेनच्या नावात फेरबदल करण्याचे अधिकारही नू डॉट कॉमला मिळाले आहेत. २०१२पासून विक्रीची प्रक्रिया सुरु होती. रेडिक्स आणि डू नट्सने नू डॉट कॉमवर विक्रीशी संबंधित प्रक्रियेच्या उल्लंघनाचा आरोपही केला होता. या डोमेनचा लिलाव आयसीएएनएन या नॉनप्रॉफिट संस्थेनेही केला होता. ही संस्था इंटरनेटच्या नावाशी संबंधित डेटाबेसचे समन्वय आणि प्रक्रियेचे काम साभाळत होती. याआधी २०१६च्या जानेवारीत डॉट शॉप या डोमेनची २७६ कोटींना विक्री झाली होती. तर त्याआधी २०१५मध्ये डॉट अॅप हे डोमेन १६६ कोटींना विकले गेले होते.