एलजीचा व्ही २० अँड्राईड नगेटसह पुढील महिन्यात येणार

lgv20
दक्षिण कोरियन टेक जायंट एलजीने त्यांचा नवा व्ही २० स्मार्टफोन अँड्राईड नगेट ७.० ओएस सह येणार असल्याचे जाहीर केले आहे. अँड्राईडची ही नवी ओएस पुढील महिन्यात लाँच होत असून त्या पाठोपाठच एलजी हा नवा स्मार्टफोन बाजारात आणत आहे. हा फोन व्ही १० चे अपग्रेड व्हर्जन असल्याचेही सांगितले जात आहे. व्ही २० युजरला उत्तम दर्जाचा मल्टीमिडीया अनुभव देईल असाही कंपनीचा दावा आहे. अर्थात फोनबाबतचे अन्य तपशील अद्यापी जाहीर केले गेलेले नाहीत.

तज्ञांच्या मते व कांही टेक वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार हा ४ व ६ जीबी रॅमचा फोन असेल. या फोनला ६४ व १२८ जीबी इंटरनल मेमरी, १६ एमपीचा रियर व ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ड्युअल सिम, ५ इंचापेक्षा मोठा स्क्रीन गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह असेल. हा फोरजी स्मार्टफोन असेल व तो वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएसला सपोर्ट करेल.

Leave a Comment