
मुंबई – आपला नवा अँड्रॉईड स्मार्टफोन एम५३५ प्लस मोबाईल उत्पादक कंपनी इनफोकसने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रु. आहे. या फोनची खासियत म्हणजे याचा दमदार सेल्फी कॅमेरा असल्यामुळे आता सेल्फी काढणाऱ्यांसाठी हा खास फोन पर्वणी ठरणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक इतरही फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
इनफोकसचा दमदार फ्रंट कॅमेरावाला नवा स्मार्टफोन लाँच
यामध्ये ५.५ इंच डिस्प्ले आहे. तर याचे रेझ्युलेशन १०८०×१९२० आहे. प्रोसेसरचा विचार केल्यास यामध्ये १.३ Ghz ऑक्टाकोअर मीडिया टेक प्रोसेसर आहे. तसेच यामध्ये ३ जीबी रॅम देण्यात आले असून इंटरनल स्टोरेज १६ जीबी आहे. तर ६४ जीबीपर्यंत मेमरी वाढविता येणार आहे. हा स्मार्टफोन ६.० मार्शमेलो सिस्टमवर आधारित आहे. यामध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच हा फोन ४जी सपोर्ट आहे. याच्या बॅटरीची क्षमता २६००mAh ऐवढी आहे.
