
न्यूयॉर्क – मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेले एक्सबॉक्स वन एस या गेम मशीनचे नवीन व्हर्जन ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ऑगस्टमध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
ऑगस्टमध्ये बाजारात येणार ‘एक्सबॉक्स वन एस’ गेम मशीन !
एक्सबॉक्स वन पेक्षा ‘एक्सबॉक्स वन एस’ ही मशीन ४० टक्के लहान असणार असून ही मशीन सर्वप्रथम ‘इ३ एक्स्पो’मध्ये ठेवण्यात येणार आहे. ही मशीन एक्सबॉक्सपेक्षा अॅडव्हांस असून, ४के अल्ट्रा एचडी व्हिडिओ आणि हाय डॉयनामिक रेंजसह आणखी फिचर्स असणार आहेत. हे गेमिंग मशीन पकडण्यासाठी सुलभ असून, दिसायलाही आकर्षक आहे. वायरलेस रेंज आणि ब्ल्यूटुथची सुविधा आहे.
