हाँगकाँगमधला बडा चोरबाजार

hong
चोरबाजार म्हटले की साधारणपणे भारतातले चोरबाजार आपल्या नजरेसमोर येतात व चोरबाजार ही भारताचीच खासियत असावी असाही आपला समज असतो. मात्र जगभरातील अनेक देशात चोरबाजार आहेत आणि केवळ स्थानिक लोकच नाही तर या देशांना भेट देणारे पर्यटकही या चोरबाजारात जाऊन खरेदीचा आनंद लुटतात.

मुंबईतील चोरबाजार जसा प्रसिद्ध आहे तसाच हाँगकॉगचा चोरबाजारही प्रसिद्ध आहे. या बाजारात प्रामुख्याने चीन मधून आलेल्या वस्तू विकल्या जातात. त्यात अँटीकचा समावेश अधिक प्रमाणात असतो. चीनमधील कलाकुसरीच्या वस्तू, पॉटरी, सिल्क कपडा, धातूकामाच्या वस्तू, दुर्मिळ मूर्ती, शिल्पे यांनी हा बाजार ओसंडून वाहत असतो. या बाजाराचे नांव आहे लस्कर रो मार्केट मात्र त्याला स्थानिक लोक कॅट स्ट्रीट म्हणून ओळखतात. गल्ली बोळातूनच हा बाजार भरलेला असतो.

अर्थात येथे खरेदी करताना फसले जाणे गृहीत धरायला हवे. अँटीक म्हणून विकत घेतलेल्या वस्तू अथवा जेडचे दागिने अनेकदा नकली निघण्याची भीती असते. घासाघीस हा अशा बाजारांचा स्थायिभाव असतो. त्यामुळे ज्यांना घासाघीस जमत नाही त्यांनी खरेदीपेक्षा केवळ नेत्रसुख घेतलेलेही बरेच. या बाजारात पर्यटकांची संख्याही प्रचंड असते.

हाँगकाँगबरोबरच अमेरिकेच्या अॅरिझोनात, पोर्तुगालच्या लिस्बन मध्ये, बँकाँक मध्येही असे प्रसिद्ध चोरबाजार आहेत. पॅरिसचा चोरबाजार तर फारच फेमस आहे.

Leave a Comment