मुंबईकरांना चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय!

best
मुंबई : तुम्ही जर मुंबईच्या बेस्ट बसने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला चालत्या बसमध्येही वाय-फायची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. बेस्ट बसेसमध्ये वायफाय सेवा आणि मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये बेस्ट बसेससाठी जीपीएस सिस्टिमची सुविधा देण्यात येणार आहे. बेस्टचे जनरल मॅनेजर जगदीश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात बेस्ट आपले स्वताचे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च करेल, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

Leave a Comment