
मुंबई : विक्रीमध्ये एक अनोख्या विक्रमाची नोंद वनप्लसने व्हीआर हेडसेटने केली असून ‘वन प्लस ३’च्या लॉन्चिंगआधीच वनप्लस कंपनीने अमेझॉनवर पाच सेकंदात ३० हजार व्हीआर हेडसेट्सची विक्री केली आहे. १० लाख लोकांनी या सेलमध्ये सहभागी होण्यासाठी आधीपासूनच रजिस्ट्रेशन केले होते.
५ सेकंदात ३० हजार वनप्लसच्या लूप व्हीआर हेडसेट्सची विक्री
लूप व्हीआर हेडसेट्स अमेझॉन लूप व्हीआर पेजवर ३ जून ते ७ जूनदरम्यान विक्रीसाठी उपलब्ध होते. वनप्लस इंडियाचे विकास अग्रवाल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, वनप्लस ३ च्या लॉन्चिंच्या तोंडावर लूप व्हीआर हेडसेट्सला अशाप्रकारे प्रतिसाद मिळाल्याने वनप्लस ३ बाबतही आशा वाढल्या आहेत. एएनटीव्हीआरच्या भागिदारीमध्ये वनप्लसने लूप व्हीआर हेडसेट्सची निर्मिती केली असून, गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या कार्डबोर्ड अपडेट आहे. तर वनप्लस ३ ची अमेझॉनवर १५ जूनपासून विक्री सुरु होणार आहे.
